‘तत्काळ’ योजना प्राधान्य सेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘तत्काळ’ योजना प्राधान्य सेवा
‘तत्काळ’ योजना प्राधान्य सेवा

‘तत्काळ’ योजना प्राधान्य सेवा

sakal_logo
By

पुणे, ता. १२ : शैक्षणिक आरोग्य किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कारणांसाठी पुरवण्यात येत असलेली तत्काळ पासपोर्ट योजना ही एक प्राधान्य सेवा आहे आणि प्रीमीयम सेवा नाही. त्यामुळे योजनेअंतर्गत अपात्र श्रेणी आणि कागदपत्रांची कमतरता असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, अशी माहिती पासपोर्ट सेवा केंद्राकडून देण्यात आली.

अनेक तत्काळ योजनेचे अर्जदार अपात्र श्रेणीमध्ये येतात किंवा त्यांच्याकडे आवश्यक प्रमाणात योग्य कागदपत्रे नसतात. तत्काळ योजनेचा गैरवापर तपासण्यासाठी पात्रता आणि कागदपत्रांचे निकष काटेकोरपणे लागू केले जातात. अपात्र श्रेणी आणि कागदपत्रांची कमतरता असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉईंटमेंटच्या दिवशी, अशा अर्जदारांना तत्काळ योजनेच्या अर्जांना सामान्य योजनेच्या अर्जांमध्ये रूपांतरित करण्यासाठी ‘Application EDIT’ पर्यायासाठी विनंती करावी लागेल आणि त्यांच्या अपॉईंटमेंट्स स्वतःहून पुन्हा शेड्यूल कराव्या लागतील, असे केंद्राकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
आधीच्या तारखांना पासपोर्ट अपॉइंटमेंट उपलब्ध करून देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या पुढाकाराअंतर्गत रद्द किंवा पुनर्निर्धारित झाल्यामुळे आधीच बुक केलेले अपॉइंटमेंट स्लॉट्स दररोज जारी केले जातात आणि अर्जदारांना उपलब्ध करून दिले जातात. अपॉइंटमेंट्सच्या उपलब्धतेनुसार, प्रादेशिक पासपोर्ट कार्यालय, पुणे अंतर्गत पासपोर्ट सेवा केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रासाठी, तत्काळ योजनेच्या अपॉईंटमेंट्स रात्री १२ वाजता वाजता जारी केल्या जातात आणि सामान्य योजनेच्या अपॉईंटमेंट्स रात्री साडेआठला जारी केल्या जातात. अर्जदार नवीन अपॉईंटमेंट्स बुक करू शकतात आणि त्यांच्या आधीच बुक केलेल्या अपॉइंटमेंट्स पूर्वीच्या तारखांना रिशेड्यूल (prepone) करू शकतात.

अधिक माहितीसाठी
तत्काळ योजनेबद्दल अधिक माहितीसाठी नागरिकांनी https://www.passportindia.gov.in/AppOnlineProject/online/tatkaalPassports येथे उपलब्ध माहिती आणि हमीपत्र काळजीपूर्वक वाचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी आम्ही एक लाख १३ हजार पेक्षा जास्त म्हणजेच २०२१च्या तुलनेत सुमारे ५० टक्के जास्त पासपोर्ट जारी केले. तसेच या वर्षी २०२३च्या पहिल्या दोन महिन्यांत, आम्ही २०२२ च्या याच कालावधीच्या तुलनेत २९ हजार अधिक पासपोर्ट जारी केले. आम्ही पासपोर्ट आणि पोलिस क्लिअरन्स सर्टिफिकेटसाठी (पीसीसी) दररोज दिलेल्या एकूण पूर्वनोंदणीच्या संख्या देखील वाढवल्या आहेत. यावर्षी, पासपोर्ट सेवा केंद्र येथे, सामान्य आणि तत्काळ योजनेच्या पूर्वनोंदण्या या दररोज सुमारे एक हजार आणि अडीचशे अशा पद्धतीने वाढवण्यात आल्या आहेत. तर गेल्या वर्षी विविध ऑनलाइन पासपोर्ट सेवा केंद्रांवर पीसीसी सेवा सुरू केली.
- डॉ. अर्जुन देवरे, पुणे विभागीय पासपोर्ट अधिकारी