Sat, March 25, 2023

कात्रज बोगद्यातील वाहतूक
आज रात्री काही काळ बंद
कात्रज बोगद्यातील वाहतूक आज रात्री काही काळ बंद
Published on : 17 March 2023, 5:57 am
पुणे, ता. १७ : कात्रज नवीन बोगद्यातील साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक १८ मार्च रोजी रात्री ११ ते १९ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत तसेच, २३ मार्च रोजी रात्री ११ वाजल्यापासून २४ मार्च रोजी पहाटे २ वाजेपर्यंत बंद राहणार आहे. या कालावधीत या रस्त्यावरील वाहतूक जुना कात्रज बोगद्यामार्गे कात्रज चौक, नवले पूल, विश्वास हॉटेलपासून सेवा रस्त्यावरून मुंबईकडे वळविण्यात येणार आहे. तर मुंबईकडून साताऱ्याकडे जाणारी वाहतूक नेहमीप्रमाणेच सुरू राहणार आहे. येथील काही तांत्रिक काम पूर्ण झाल्यानंतर नवीन कात्रज बोगद्याची साताऱ्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत करण्यात येईल. नागरिकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी केले आहे.