Tue, March 28, 2023

लोणीकाळभोरमध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा
लोणीकाळभोरमध्ये ऑनलाइन जुगार अड्ड्यावर छापा
Published on : 18 March 2023, 4:28 am
पुणे, ता. १८ : व्हॉटस् ॲपवर ऑनलाइन कल्याण मटका चालविणाऱ्या ऑनलाइन जुगार अड्ड्यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने शुक्रवारी छापा टाकला. लोणीकाळभोर परिसरातील वाकवस्तीमधील अड्ड्यांवर ही कारवाई करण्यात आली. या वेळी, सात व्यक्तींसह त्यांच्या साथीदारांकडून जुगारातील रोख रक्कम व साहित्य असा ७९ हजार ४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सामाजिक सुरक्षा विभागाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहायक पोलिस निरीक्षक अनिकेत पोटे, अंमलदार राजेंद्र कुमावत, बाबा कर्पे, तुषार भिवरकर, इम्रान नदाफ, संदीप कोळगे, अमित जमदाडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.