Thur, June 1, 2023

गोखलेनगरमध्ये चंदनाची तीन झाडे चोरीला
गोखलेनगरमध्ये चंदनाची तीन झाडे चोरीला
Published on : 18 March 2023, 4:31 am
पुणे, ता. १८ : गोखलेनगर परिसरातून चोरट्यांनी चंदनाची तीन झाडे चोरून नेल्याचा प्रकार उघड झाला आहे. शुक्रवारी मध्यरात्री तीनच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत रोहिणी घाडगे (वय ३२, रा. गोखलेनगर) यांनी तक्रार दिली. तक्रारदार या वनरक्षक पदावर वन विभागात कार्यरत आहेत. गोखलेनगरच्या वनविभागाच्या भिंतीशेजारी तीन चंदनाची झाडे होती. त्यावर पाळत ठेवून चंदन चोरट्यांनी ५० हजार रुपयांची तीनही झाडे मध्यरात्री तीनच्या सुमारास कापून चोरून नेली. सकाळी हा प्रकार समोर आल्यानंतर तक्रारदार यांनी पाहणी करून पोलिसांकडे याबाबत तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवर गुन्हा नोंद केला आहे.