
फोटो मॉर्फ करून महिलेची बदनामी
पुणे, ता. १८ : महिलेसह तिच्या आईचे फोटो मॉर्फ करून त्याद्वारे अश्लील प्रोफाईल तयार करत त्यांची बदनामी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यांचे हे प्रोफाईल मित्र व त्यांच्या समाज माध्यमावरील फॉलोअर्संना पाठविले आहेत. हा प्रकार त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी विचारणा केली असता त्यांच्याकडे वेगवेगळ्या रक्कमा मागण्यात आल्या. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात ४८ वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. त्यानुसार, सिद्धु गुर्जर व इतर एका अनोळखी व्यक्तीवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. १ ते १७ मार्च दरम्यान हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार स्टार मेकर हे अॅप वापरतात. त्यादरम्यान दोघांनी त्यांच्या प्रोफाईल वरून मुलीचा व त्यांचा फोटो घेऊन तो मॉर्फ केला. तसेच, वेगवेगळे अश्लील प्रोफाईल बनविले. त्यानंतर त्यांच्या ओळखीतील व स्टार मेकर अॅपवरील फॉलोअर्सला हे अश्लील प्रोफाईल पाठवून त्यांची बदनामी केली.