गुंड टोळक्याकडून तरुणावर तलवारीने वार

गुंड टोळक्याकडून तरुणावर तलवारीने वार

पुणे, ता‌. १८ : गुंड टोळक्याने तरुणावर तलवारीने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत चेतन मारुती शेडगे (वय २४, रा. रामनगर, वारजे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार वारजे पोलिसांनी गौरव संजय शेळके (वय २१, रा. वारजे), अभिषेक नवनाथ संकट (वय १९, रा. रामनगर, वारजे), सचिन शंकर दळवी (वय २३, रा. दांगट पाटीलनगर) या तिघांना अटक केली आहे. त्यांचे साथीदार ओंकार मांढरे, रोहन पाटोळे, साहिल बल्लाळ, आमिश धावरे यांच्यावर गुन्हा दाखल केला असून, सर्वजण सराईत गुन्हेगार आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी चेतन शेडगे आणि त्यांचा मित्र कृष्णा शिंगाडे हे रविवारी (ता. १६) रात्री ११ वाजण्याच्या सुमारास रामनगरमधील प्रणव सुपर मार्केटजवळ बसले होते. त्यावेळी आरोपी तलवार, लोखंडी हत्यार घेऊन तेथे आले. सचिन दळवी याने फिर्यादीला ‘अण्णा डोळसे कोठे आहे’, असे विचारले. त्यावर फिर्यादीने माहिती नाही, असे उत्तर दिले. त्यावर आरोपींनी फिर्यादीच्या हातावर आणि कमरेवर तलवारीने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याचा मित्र कृष्णा शिंगाडे याने आरोपींना रोखण्याचा प्रयत्न केला असता तोही जखमी झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com