‘यिन’चे वादळ दिल्लीत धडकणार
महाराष्ट्र भवनातील केंद्रीय अधिवेशनाचे उद्या उद्‍घाटन

‘यिन’चे वादळ दिल्लीत धडकणार महाराष्ट्र भवनातील केंद्रीय अधिवेशनाचे उद्या उद्‍घाटन

पुणे, ता. २३ : सकाळ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’चे (यिन) वादळ आता दिल्लीत धडकणार आहे. प्रथमच केंद्रीय अधिवेशन थेट देशाच्या राजधानीत मंगळवारी (ता. २५) आणि बुधवारी (ता. २६) आयोजित करण्यात येत आहे.

‘यिन’च्या १० समित्यांचे राज्यभरातील प्रतिनिधी दिल्ली येथील केंद्रीय अधिवेशनात सहभागी होत आहेत. मंगळवारी प्रतिरूप सभागृहाचे उद्‍घाटन केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या हस्ते पार पडेल. या वेळी केंद्रीय समितीच्या सभापती दिव्या पाटील अहवालाचे वाचन करतील. तर पहिल्या दिवसाच्या अधिवेशनात केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, दक्षिण मध्य मुंबईचे खासदार राहुल शेवाळे, भाजप महिला मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रणिता देवरे-चिखलीकर आणि युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी मार्गदर्शन करणार आहेत. बुधवारी (ता. २६) केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेचे राज्य सचिव भिमेश मुथूला, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव डॉ. ओमप्रकाश शेटे, धावपटू, उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते कृष्णराज महाडिक मार्गदर्शन करणार आहे. अधिवेशनात काही महत्त्वाचे ठरावही पारीत करण्यात येणार आहेत. हे अधिवेशन यशस्वीपणे पार पडावे, यासाठी खासदार प्रतापराव चिखलीकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.

महत्त्वाचे ठराव...
- व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्राधान्य हवे
- अल्प उत्पन्न गटांतील मुलांना एसटी आणि रेल्वेचा मोफत पास मिळावा
- दहा हजार लोकसंख्येच्या गावतही व्यावसायिक प्रशिक्षण केंद्र असावे
- पोलिस आणि सैन्य भरतीमध्ये निवड न झालेले. परंतु, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र समिती गठित करावी
- एमपीएससी, यूपीएससी परीक्षेमधून पहिल्या गटामध्ये बसणाऱ्या युवकांना शासनाच्या विविध स्तरांवर संचालक किंवा विश्वस्त म्हणून घ्यावे
- कृषी पदवीधरांना सहकार आणि कृषी क्षेत्रामध्ये स्थान देण्यात यावे
- शेतीसाठी युवकांना मार्गदर्शन व भांडवल मिळावे
- पारंपरिक व्यवसाय करणारे मच्छीमार, मेंढपाळ, गवळी, सुतार, चांभार यांना सवलती आणि अनुदान मिळावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com