स्वारगेट परिसरातील सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वारगेट परिसरातील सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई
स्वारगेट परिसरातील सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई

स्वारगेट परिसरातील सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. २६ : स्वारगेट येथील गुलटेकडी परिसरात दहशत माजविणाऱ्या सराईत गुन्हेगाराविरुद्ध पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पोलिस आयुक्तांच्या आदेशाने आतापर्यंत शहरातील दहा गुन्हेगारांविरुद्ध ‘एमपीडीए’ कारवाई केली आहे.
सैफअली वाहिद बागवान (वय २०, रा. इंदिरानगर वसाहत, गुलटेकडी) असे कारवाई केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला एक वर्षासाठी कोल्हापूर येथील कारागृहात स्थानबद्ध करण्यात येणार आहे. बागवान याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, दहशत माजविणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. बागवान याच्याविरुद्ध एमपीडीए कारवाई करण्याचा प्रस्ताव स्वारगेट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक इंदलकर, गुन्हे प्रतिबंधक शाखेच्या पोलिस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी तयार केला होता. या प्रस्तावास पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मंजुरी दिली.