सोन्याच्या दालनातून १२४ तोळे लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोन्याच्या दालनातून १२४ तोळे लंपास
सोन्याच्या दालनातून १२४ तोळे लंपास

सोन्याच्या दालनातून १२४ तोळे लंपास

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : हडपसर येथील चंदुकाका सराफ अँड सन्स या सोन्याच्या दालनातून १२४ तोळे सोने कामगारांनीच लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या दागिन्यांची किंमत ७९ लाख ३८ हजार इतकी आहे. कोमल अनिल केदारी (वय २४, रा. नाना पेठ) आणि सागर सूर्यकांत नकाते (वय ३२, ससाणेनगर, हडपसर) अशी संशयितांची नावे आहेत. नोव्हेंबर २०२२ ते एप्रिल २०२३ दरम्यान हा प्रकार घडला. याबाबत ओंकार प्रताप तिवारी (वय २९, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंदुकाका सराफ अँड सन्स यांच्या मगरपट्टा येथील दुकानात कोमल आणि सागर हे अकाउंट्स विभागात काम करतात. दालनात येणाऱ्या सोन्याच्या वस्तू, गंठण, पाटल्या यासारखे दागिने त्या दोघांनी परस्पर फायनान्स कंपनीकडे गहाण ठेवले होते. गहाण ठेवलेल्या दागिन्यांच्या रकमेतून या दोघांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवल्याचा संशय आहे. हा सगळा प्रकार व्यवस्थापनाच्या लक्षात आल्यानंतर हडपसर पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.