महाविद्यालयात झालेल्या वादातून युवकावर धारदार शस्त्राने वार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाविद्यालयात झालेल्या वादातून युवकावर धारदार शस्त्राने वार
महाविद्यालयात झालेल्या वादातून युवकावर धारदार शस्त्राने वार

महाविद्यालयात झालेल्या वादातून युवकावर धारदार शस्त्राने वार

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : महाविद्यालयात झालेला वाद मिटविण्याच्या बहाण्याने युवकाला बोलावून घेऊन टोळक्याने त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. सदाशिव पेठेतील रेणुका स्वरूप प्रशालेजवळील गल्लीत हा प्रकार घडला.
टोळक्याने केलेल्या हल्ल्यात शंतनू गायकवाड (वय १९, रा. प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) गंभीर जखमी झाला आहे. या प्रकरणी सुजय शिंदे याच्यासह नऊ ते दहा जणांविरुद्ध विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंतनू आणि सुजय यांच्यात महाविद्यालयाच्या परिसरात वाद झाला होता. वाद मिटविण्यासाठी सुजयने शंतनूला रेणुका स्वरूप शाळेजवळील गल्लीत बोलावून घेतले. तेथे बाचाबाची झाल्यानंतर सुजयसह साथीदारांनी शंतनूवर धारदार शस्त्राने वार केले. या घटनेत शंतनू गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.