मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय

मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय

पुणे, ता. ६ : विमाननगर भागात मसाज पार्लरमध्ये सुरू असलेला वेश्या व्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी मसाज पार्लरवर छापा टाकून सहा तरुणींना ताब्यात घेतले. या प्रकरणी मसाज सेंटरच्या व्यवस्थापकासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मसाज सेंटर व्यवस्थापक मणीकंठ राहुल नायडू (वय २०, रा. थेरगाव, पिंपरी-चिंचवड), विशाल अग्रवाल, नायडू बाई, नितीन माने यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मणीकंठ नायडूला पोलिसांनी अटक केली असून, पोलिस नाईक इम्रान नदाफ यांनी विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विमाननगर भागात अमायरा स्पा नावाच्या मसाज पार्लरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com