‘आम्ही नूमविय’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आम्ही नूमविय’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
‘आम्ही नूमविय’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

‘आम्ही नूमविय’चा जीवनगौरव पुरस्कार जाहीर

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : नूतन मराठी विद्यालय प्रशालेच्या ‘आम्ही नूमविय’ या माजी विद्यार्थी संघटनेतर्फे देण्यात येणारा यंदाचा नूमवि जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे आणि ज्येष्ठ अर्थ सल्लागार आणि कॉसमॉस बँकेचे उपाध्यक्ष मुकुंद अभ्यंकर यांना जाहीर करण्यात आला आहे. तर मरणोत्तर जीवनगौरव पुरस्कार माजी सनदी अधिकारी शरद काळे यांना जाहीर करण्यात आला आहे, अशी माहिती अजित रावेतकर, मोहन उचगावकर, मिलिंद शालगर आणि किशोर लोहोकरे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

शनिवार (ता. १३) सायंकाळी सहा वाजता, नूमवि प्रशाला, बाजीराव रस्ता, पुणे येथे हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रशासक विद्याधर अनास्कर भूषविणार असून, प्रमुख पाहुणे म्हणून गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अजित रानडे उपस्थित राहणार आहेत. यंदा ‘नूमविरत्न’ पुरस्कार माधव ढेकणे, रवींद्र कुलकर्णी, रमाकांत परांजपे, प्रकाश भोंडे आणि अॅड. विजय सावंत यांना जाहीर करण्यात आला आहे. तर ‘नूमविभूषण’ पुरस्कार जगदीश आफळे, डॉ. अविनाश भोंडवे, मुकुंद संगोराम, मोहनकुमार भंडारी, प्रमोद फळणीकर आणि डॉ. अमित काळे यांना प्रदान करण्यात येणार आहे. तर यशस्वी तरुण नूमविय म्हणून जसराज जोशी यांची निवड करण्यात आली आहे. या कार्यक्रमाद्वारे शाळेच्या देदीप्यमान परंपरेचे दर्शन घडावे आणि नव्या विद्यार्थ्यांना कर्तृत्ववान आदर्श व्यक्तींचे विचार ऐकायला मिळावे, हा या सोहळ्याचा उद्देश आहे. हा कार्यक्रम सगळ्यांसाठी खुला असून प्रशालेच्या माजी विद्यार्थ्यांसह पुणेकरांनी या वेळी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.