वनस्पतींचे महत्त्व आयुर्वेदाच्या काळापासूनच :  भूषण गोखले

वनस्पतींचे महत्त्व आयुर्वेदाच्या काळापासूनच : भूषण गोखले

पुणे, ता. ११ : वनस्पतींचे महत्त्व हे आयुर्वेदाच्या काळापासूनच आहे. मात्र अलीकडील काळात त्याकडे दुर्लक्ष होत आहे. मात्र, प्राध्यापक घाणेकर यांच्या पुस्तकातून ते महत्त्व सगळ्यांपर्यंत पोहचत आहे. त्यांनी गड किल्ले, वनस्पतीविषयी आपल्या पुस्तकातून मांडलेले ज्ञान हे भविष्यातही कामी येईल. त्यांनी पुस्तकातून गडकिल्ल्यांविषयी मांडलेल्या माहितीतून गड, किल्ल्यांना बोलते केले आहे, जे इतरांना जमणार नाही, असे मत एअर मार्शल भूषण गोखले (निवृत्त) यांनी व्यक्त केले.
प्र. के. घाणेकर मित्रमंडळ व स्नेहल प्रकाशन यांच्या वतीने इतिहास अभ्यासक प्रा. प्र. के. घाणेकर यांचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सत्कार समारंभ आणि ‘जमलं तसं’ या आत्मचरित्राचे प्रकाशनाचे आयोजन केले होते. हे प्रकाशन एअर मार्शल गोखले यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते.
या प्रसंगी मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, प्रकाश देशपांडे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘‘घाणेकर यांनी गडकिल्ले फिरत कित्येक माणसे घडवली. त्यांना गड किल्ल्यांचा अभ्यास करत जीवनाला अर्थ दिला आहे.’’
‘‘घाणेकर जे लिहितात त्यातून इतिहास, भूगोल या सगळ्याची एकत्रित माहिती मिळते. ही माहिती आयुष्यभर उपयोगी येईल,’’ असे मत गोखले यांनी व्यक्त केले.
इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे म्हणाले, ‘‘घाणेकर हे गड किल्ल्यांचे वेध लावणारे व्यक्तिमत्त्व आहेत. गेली कित्येक वर्षे त्यांचा सहवास लाभला आहे. ७५व्या वर्षात त्यांचे १००वे पुस्तक प्रकाशित होत असून त्यांनी अनेक किल्ले, मंदिर, आदींवर पुस्तके लिहले आहेत. गड किल्ले ऐतिहासिक वारसा असून त्यातून प्रेरणा घेत उद्याची पिढी घडवली पाहिजे, या भूमिकेतून ते तरुणांना गड किल्ल्यापर्यंत घेऊन गेले. गड किल्ल्यांचे जतन-संवर्धन व्हावे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत.’’
यावेळी माजी आमदार मेधा कुलकर्णी, सुधीर थोरात, डॉ. मंदार दातार, सजक नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, अभय घाणेकर, आशुतोष बापट, प्रकाश देशपांडे आदींनी मनोगत व्यक्त केले.

मी साहित्यिक नाही, तर लेखक आहे. गड किल्ल्यांची भटकंती करताना ज्या किल्ल्यांची माहिती नाही ती सोडून लिहिण्याचा प्रयत्न केला. हिमालय, समुद्र आणि सह्याद्री हे नेहमीच आकर्षणाचे केंद्र आहेत. किल्ले समजून घेऊन त्याचा अभ्यास करत, जे जमलं तसं सर्वांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
- प्र. के. घाणेकर, इतिहास अभ्यासक व लेखक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com