मिळकतकर बिल आजपासून ऑनलाइन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकतकर बिल आजपासून ऑनलाइन
मिळकतकर बिल आजपासून ऑनलाइन

मिळकतकर बिल आजपासून ऑनलाइन

sakal_logo
By

पुणे, ता. १४ ः पुणे महापालिकेकडून सुमारे सात लाख मिळकतकरांची बिल ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आली आहेत. सोमवारपासून (ता. १५) नागरिकांना मिळकतकरांची बिल पाहता येतील. संबंधित बिल डाउनलोड करून तत्काळ भरणा करणे नागरिकांना शक्य होणार आहे. तर ३१ मेपर्यंत प्रत्यक्षात बिल नागरिकांना पोहोच होणार आहेत.

महापालिकेच्या कर संकलन विभागाकडून दरवर्षी नागरिकांना १ एप्रिलपासून मिळकतकरांची बिल देण्यास सुरुवात होते. तेव्हापासून महापालिका प्रशासनाकडून प्रारंभी ई-मेल, संदेश आणि त्यानंतर प्रत्यक्षात छापील मिळकतकर बिलांचे वाटप केले जाते. मात्र, यावर्षी मिळकतकर संबंधी ४० टक्के सवलतीला मंजुरीबाबतचा राज्य सरकारचा अध्यादेश निघाला नसल्यामुळे पालिकेला पुढील कार्यवाही करण्यास मर्यादा येत होत्या. २१ मे रोजी राज्य शासनाने अध्यादेश काढला, त्यांनतर महापालिकेने बिल तयार करण्याची कार्यवाही सुरू केली. त्यानुसार, महापालिका प्रशासनाकडून मागील काही दिवसांपासून मिळकतकर बिल नागरिकांना वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी प्रक्रिया सुरू केली होती. त्यानुसार, पहिल्यांदा ऑनलाइन माध्यमाद्वारे आणि त्यानंतर प्रत्यक्षात मिळकतकर बिल नागरिकांना देण्यास महापालिकेकडून प्राधान्य देण्यात आले आहे.

सोमवारपासून ७ लाख १० हजार मिळकतकर बिल ऑनलाइन उपलब्ध होतील. ते डाउनलोड करून नागरिकांना मिळकतकर भरता येईल. तसेच बिल डाउनलोड न करता मिळकतीचा क्रमांक टाकूनही नागरिकांना मिळकतकर भरता येणार आहे. दरवर्षी एक एप्रिल ते ३१ मे या काळात कालावधीत बिल भरणाऱ्या नागरिकांना सर्वसाधारण करात पाच ते दहा टक्के सवलत दिली जाते. यंदा बिलांचे वितरणच १५ मे पासून सुरू होणार आहे. त्यामुळे नागरिकांना १५ जुलैपर्यंत तत्पर भरणा सवलत दिली जाईल. ज्या नागरिकांना ३१ मेपर्यंत बिल दिली जातील, त्यांना ३१ जुलैपर्यंत सवलत मिळेल.

सोमवारपासून ७ लाख १० हजार मिळकतकराची बिल ऑनलाइन उपलब्ध होतील. तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत सर्व छापील मिळकतकर बिले नागरिकांना उपलब्ध होतील.
- अजित देशमुख, उपायुक्त, कर संकलन विभाग, पुणे महापालिका.