मिळकतकराचे दोन दिवसांत १६ कोटी पालिकेच्या तिजोरीत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मिळकतकराचे दोन दिवसांत
१६ कोटी पालिकेच्या तिजोरीत
मिळकतकराचे दोन दिवसांत १६ कोटी पालिकेच्या तिजोरीत

मिळकतकराचे दोन दिवसांत १६ कोटी पालिकेच्या तिजोरीत

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : महापालिकेच्या मिळकतकर विभागाने १५ मे पासून ऑनलाइन मिळकतकर बिले उपलब्ध करून दिल्यानंतर दोन दिवसांतच पुणेकरांनी चांगला प्रतिसाद देत १६ कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत जमा केले. पालिकेने पहिल्या दिवशी ७ लाख ६० हजार मिळकतकरधारकांची बिले ऑनलाइन उपलब्ध करून दिली होती.

दरम्यान, पुणेकरांनी ऑनलाइन मिळकतकर तत्काळ भरण्यास प्राधान्य दिले. त्यानुसार, सोमवारी ८ कोटी ४८ लाख रुपये नागरिकांनी भरले. मंगळवारपर्यंत १६ कोटी ७४ लाख रुपयांपर्यंतची रक्कम नागरिकांनी मिळकतकरापोटी भरली, अशी माहिती कर आकारणी व संकलन विभागाचे प्रमुख अजित देशमुख यांनी दिली. आगामी काही दिवसांत सर्व मिळकतकर बिले ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात येतील. तसेच प्रत्यक्षात बिल ३१ मेपर्यंत नागरिकांना पाठविण्यात येणार आहेत. २०१९ पासून आकारणी झालेल्या मिळकतधारकांनी तसेच समाविष्ट गावांतील नागरिकांनी १५ नोव्हेंबरपर्यंत लगतच्या क्षेत्रीय कार्यालय, कर निरीक्षकांकडे पीटी फॉर्म भरून द्यावेत, असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.