Wed, October 4, 2023

चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत धनराज शिर्के याची निवड
चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत धनराज शिर्के याची निवड
Published on : 22 May 2023, 12:47 pm
धनकवडी, ता. २२ : बिश्केक (किर्गिझस्तान) येथे होणाऱ्या १७ वर्षां आतील फ्री स्टाइल आशियायी चॅम्पियनशिप कुस्ती स्पर्धेत धनकवडीतील धनराज भरत शिर्के हा देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
हरियानातील (सोनिपत) भारतीय खेल प्राधिकरणात आशियायी चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी भारतीय संघाची निवड चाचणी खुल्या पद्धतीने करण्यात झाली. यात अनेक राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय कुस्तीगिरांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातून अनेक कुमार कुस्तीगिरांनी यात सहभाग घेऊन धनराज शिर्के (पुणे जिल्हा) याने ४५ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवून आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले.