अभिनेत्री अलका कुबल यांनी महिला कैद्यांशी सधला संवाद

अभिनेत्री अलका कुबल यांनी महिला कैद्यांशी सधला संवाद

अलका कुबल यांचा
महिला कैद्यांशी संवाद
पुणे, ता. २८ : येरवडा कारागृह प्रशासन,भोई प्रतिष्ठान व आदर्श मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘प्रेरणापथ'' उपक्रमांतर्गत अभिनेत्री अलका कुबल यांच्या स्नेहसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कुबल यांनी महिला कारागृहामध्ये सुरू असलेल्या विविध रोजगार प्रकल्पांची पाहणी केली. कार्यक्रमाचे संयोजक भोई प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रेरणापथ प्रकल्पाचे समन्वयक डॉ. मिलिंद भोई यांनी आयोजनमागील भूमिका स्पष्ट केली. कारागृहांमध्ये महिला कैद्यांना भावनिक व मानसिक आधार देण्यासाठी अशा प्रकारचे उपक्रम सातत्याने आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगितले.
याप्रसंगी महिला कारागृह अधीक्षक अनिल खामकर, आदर्श मंडळाचे अध्यक्ष उदय जगताप, उपअधीक्षक पल्लवी कदम, कारागृह अधिकारी तेजश्री पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
-----

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com