
चुकवू नये असे काही
चुकवू नये असे काही
१) ‘सावली’ कला प्रदर्शन :
आर्ट फाउंडेशनतर्फे ‘सावली’ या सामूहिक कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. गिरीश मुरूडकर यांच्या ‘सिपोरेक्स ब्लॉक्स’ या माध्यमातील कलाकृती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण असणार आहे. त्यांच्यासह सुमारे ३० कलाकारांच्या कलाकृती या प्रदर्शनात रसिकांना पाहायला मिळतील.
कधी : गुरुवार (ता. १) ते शनिवार (ता. ३)
केव्हा : सकाळी १० ते रात्री ८
कुठे : बालगंधर्व कलादालन, जंगली महाराज रस्ता
२) ‘मोगरा फुलला’ :
कोथरूडमधील कोकण आंबा महोत्सवानिमित्त या मराठी व हिंदी चित्रपट गीते, भावगीते, भक्तिगीते आणि लोकगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. अनघा राजवाडे व संजय मरळ हे गायक हा कार्यक्रम सादर करणार आहेत. सूर तेच छेडिता, चाफा बोलेना, सांग कधी कळणार तुला, ये समा है ये प्यार का, अशा सदाबहार गीतांची पर्वणी या कार्यक्रमात मिळणार आहे.
कधी : शुक्रवारी (ता. २)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कुठे : महेश विद्यालय, कोथरूड
३) ‘कविवरा विद्याधरा’ :
नाटककार विद्याधर गोखले यांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांच्या काव्यप्रतिभेवर आधारित ‘कविवरा विद्याधरा’ हा काव्य-नाट्यगीत गायनाचा विशेष कार्यक्रम ‘कलाद्वयी’ या संस्थेतर्फे आयोजित करण्यात आला आहे. गोखले यांची गद्यकाव्य आणि नाट्यगीते या कार्यक्रमात सादर केली जाणार आहेत. कार्यक्रमाची संकल्पना आणि निवेदन वर्षा जोगळेकर यांचे असून या कार्यक्रमात अस्मिता चिंचाळकर, चिन्मय जोगळेकर, संजय गोसावी यांचा सहभाग आहे.
कधी : रविवार (ता. ४)
केव्हा : सायंकाळी ५.३० वाजता
कुठे : ज्योत्स्ना भोळे सभागृह, हिराबाग चौक, टिळक रस्ता
४) संगीत सभा :
ज्येष्ठ तबलावादक पं. भाई गायतोंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संगीत सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात श्रीपाद पारखे आणि पं. सुप्रीत देशपांडे यांचे स्वतंत्र तबला वादन सादर होणार आहे. या कलाकारांना श्रीराम हसबनीस आणि संकेत सुवर्णपाठकी यांची नगमा साथ करणार आहेत.
कधी : रविवार (ता. ४)
केव्हा : सायंकाळी ६ वाजता
कुठे : एस. एम. जोशी सभागृह, नवी पेठ