
मावळातील निवेदकांचा लग्नसोहळ्यात सन्मान
तळेगाव दाभाडे, ता. १२ : घरासमोरील लग्नमंडपापासून मोठ्या गार्डनपर्यंत होणाऱ्या लग्न समारंभामध्ये निवेदक म्हणून विनामूल्य महत्त्वाची जबाबदारी सांभाळणाऱ्या मावळ तालुक्यातील निवेदकांचा सन्मान कासारसाई येथे झालेल्या राक्षे आणि गराडे परिवारातील लग्न सोहळ्यामध्ये करण्यात आला. सुलक्षणा सुनील राक्षे यांच्या स्मरणार्थ राक्षे व गराडे परिवाराच्या लग्न समारंभात निवेदकांचा सन्मान करण्यात आला. लग्न सोहळ्यात निवेदक महत्त्वाची भूमिका बजावत असतो.
अशाप्रकारे कुठलाही मोबदला न घेता किंवा कुठल्याही सत्काराची अपेक्षा न ठेवता वर्षानुवर्षे निवेदक म्हणून जबाबदारी सांभाळणाऱ्या मावळ तालुक्यातील निवेदक मंडळींचा प्रसिद्ध निवेदक गणपतराव राक्षे यांच्या संकल्पनेतून करण्यात आला. या वेळी सन्मानचिन्ह, चांदीची प्रतिमा, शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.
दोन दिवसांपूर्वी वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स येथे झालेल्या वाघमारे व घारे या लग्नसमारंभातही निवेदकांचा सत्कार करण्यात आला होता.
Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10011 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..