गुंगीच्या गोळ्या खायला देऊन महिलेवर अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुंगीच्या गोळ्या खायला देऊन महिलेवर अत्याचार
गुंगीच्या गोळ्या खायला देऊन महिलेवर अत्याचार

गुंगीच्या गोळ्या खायला देऊन महिलेवर अत्याचार

sakal_logo
By

पिंपरी, ता. १९ : मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीच्या गोळ्या खायला देवून तिच्यावर अत्याचार केला. याचे अश्लील फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देत पुन्हा वेळोवेळी अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे.
राजुनानाभाऊ गुलदगड (वय ५०, रा. चाकण) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित महिलेने फिर्याद दिली. फिर्यादी या कपडे खरेदी करण्यासाठी चाकण येथे गेले असता त्यांची आरोपीशी ओळख झाली. मूल होण्यासाठी आरोपीने आयुर्वेदिक गोळ्या देऊन फिर्यादीकडून ९० हजार रुपये घेतले. त्यानंतर काही दिवसांनी आरोपी पुन्हा फिर्यादी यांच्या भोसरी येथील घरी आला. मुल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या आणल्याचे सांगत त्यांना गुंगीच्या गोळ्या खायला दिल्या. त्यानंतर फिर्यादीवर लैंगिक अत्याचार करून त्यांचे अश्लील फोटो काढले. फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत फिर्यादीवर वेळोवेळी अत्याचार केला. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pim22b10188 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..