एटीएममधून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एटीएममधून रोकड चोरण्याचा 
प्रयत्न करणाऱ्याला अटक
एटीएममधून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

एटीएममधून रोकड चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्याला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः एटीएम मशिनमध्ये छेडछाड करून पैसे लांबविण्याचा प्रयत्न केल्याची घटना शनिवारी कोंढवा येथे घडली. याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत प्रफुल ढंगारे (वय ३९, रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. कोंढवा खुर्द येथे उज्जीवन स्मॉल फायनान्स बँकेची शाखा आहे. ढंगारे हे येथे व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. बँकेच्या आवारात एटीएम केंद्र आहे. शनिवारी सकाळी पैसे काढण्याच्या बहाण्याने आतमध्ये शिरलेल्या तिघांनी मशिनमध्ये छेडछाड केली. त्यातून पैसे काढण्याचा प्रयत्न करून एटीएम मशिनचे नुकसान केले आहे. एटीएम केंद्रात असलेल्या सीसीटीव्हीमध्ये हा प्रकार कैद झाला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22a01664 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top