पुणेकरांना ७५ हून अधिक आकर्षक पेन पाहण्याची संधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणेकरांना ७५ हून अधिक आकर्षक पेन पाहण्याची संधी
पुणेकरांना ७५ हून अधिक आकर्षक पेन पाहण्याची संधी

पुणेकरांना ७५ हून अधिक आकर्षक पेन पाहण्याची संधी

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः ‘द इंक ॲण्ड पेन’तर्फे ‘द पुणे फाउन्टन पेन शो’ या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनात तेरा देशातील ७५ हून अधिक ब्रँड्सचे पेन पाहता येणार आहेत. अशी माहिती आयोजक रश्मी नगरकर-पिल्ले यांनी मंगळवारी (ता. २७) पत्रकार परिषदेत दिली.

हे प्रदर्शन ३० सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत आपटे रस्त्यावरील श्रुती मंगल कार्यालयात सकाळी १० ते रात्री ८.३० या या वेळेत सर्वांसाठी खुले असेल. वस्तू व सेवा कर विभागाच्या उपायुक्त अंजली ढमाळ, साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखिका डॉ. संगीता बर्वे आणि माजी पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे, असे रश्मी यांनी सांगितले. प्रदर्शनात कॅलिग्राफी पेन, व्हिन्टेज पेन, विविध रंगांच्या शंभरहून अधिक शाईच्या बाटल्या आणि पेन ठेवण्याच्या केसेस उपलब्ध असणार आहेत. या वेळी पेनच्या नीबची विनामूल्य दुरुस्ती करून देण्यात येईल. प्रदर्शनात आकर्षक हस्ताक्षर स्पर्धाही रंगेल. १८ कॅरेट गोल्ड नीब असलेले जर्मनीतील द हॅगिंग गार्डन्स ऑफ बॅबिलोन हे शाईचे पेन प्रदर्शनात ठेवण्यात येणार आहे. चिकित्सक, चोखंदळ पुणेकरांसाठी ‘पुणे २२’ या नावाने शाईचे पेन तयार करण्यात आले असून तेही प्रदर्शनात ठेवण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी खास ‘स्टुडन्ट १००० एच टी आर’ हे पेन प्रदर्शनातील आकर्षण असेल. प्रदर्शनात पेनांची विक्रीदेखील केली जाणार असल्याने आयोजक रश्मी यांनी सांगितले.