मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक
मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

मुलीचे अपहरण करणाऱ्या महिलेला अटक

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः फुटपाथवर फुगे विकणाऱ्या एका महिलेच्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करणाऱ्या रेकॉर्डवरील महिलेला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली.
उषा नामदेव चव्हाण (वय ४०, रा. अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयूरी विनोद गायकवाड (वय २३, रा. ढोले पाटील रोड) यांनी फिर्याद दाखल केली होती. आरोपी महिलेला दोन मुले व दोन मुली आहेत. आरोपी महिलेच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले असून लग्नामध्ये तिने ३० हजार रुपये हुंडा घेतलेला आहे. त्यांच्या समाजामध्ये मुलीचे लग्न करताना मुलाच्या वडिलांकडून हुंडा घेण्याची प्रथा आहे. या कारणास्तव आरोपी महिलेने अल्पवयीन मुलीला पळवून नेवून तिला भिक्षा मागण्यास लावणे तसेच तिचे लग्न करताना हुंडा घेण्याचा विचाराने ती खेळत असताना तिला उचलून घेऊन निघून गेली होती. ही महिला रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22b64111 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top