पुण्यात आधी लढाई पक्षांतर्गत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात आधी लढाई पक्षांतर्गत
पुण्यात आधी लढाई पक्षांतर्गत

पुण्यात आधी लढाई पक्षांतर्गत

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ ः नव्या प्रभाग रचनेनुसार शहरात ५८ प्रभागांमध्ये १७३ नगरसेवक संख्या आहे. यामध्ये अनुसूचित जातीचे २३ आणि अनुसूचित जमातीचे २ नगरसेवक असतील. ५० टक्के आरक्षणानुसार ८७ ठिकाणी महिला उमेदवार निवडून येणार आहेत. यात अनुसूचित जातीच्या १२ व अनुसूचित जमातीची एक महिला नगरसेविका असेल. ५८ पैकी २९ प्रभागात तीन पैकी दोन सदस्य या महिला असणार आहेत. त्यामुळे एकाअर्थाने या प्रभागांमध्ये महिलाराज असणार आहे. तसेच या २९ ठिकाणी महिलांची संख्या जास्त असल्याने त्या भागातील पुरुष उमेदवारांमधील स्पर्धा वाढली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी प्रथम पक्षांतर्गत लढाई जिंकावी लागेल, त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराला भिडावे लागणार असल्याचे चित्र पुणे शहरात आहे.


आकडे बोलतात
एकूण प्रभाग - ५८
एकूण नगरसेवक -१७३
महिलांसाठी आरक्षीत - ८७
अनुसूचित जातीच्या महिलांसाठी राखीव जागा - १२
अनुसूचित जमातीच्या महिलांसाठी राखीव जागा - १
सर्वसाधारण गटातील महिलांसाठी राखीव जागा - ७४

Web Title: Todays Latest Marathi News Pne22b83362 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top