
अवतीभवती
सीकेपी साहित्य संमेलन रविवारी
पुणे, ता. १९ : अखिल भारतीय चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) समाजाचे दुसरे साहित्य संमेलन येत्या रविवारी (ता. २२) पद्मावतीजवळील अण्णाभाऊ साठे रंगमंदिरात होणार आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता याचे उद्घाटन होणार आहे. मुंबईतील सीकेपी मध्यवर्ती संस्था, श्रीमंत सरदार स. ह. गुप्ते आणि पुण्यातील सीकेपी कार्यालय ट्रस्ट यांच्यातर्फे हे संमेलन होणार आहे. या प्रसंगी माजी केंद्रीय मंत्री सुबोधकांत सहाय आणि मावळते अध्यक्ष प्रवीण दवणे उपस्थित राहणार आहेत, असे संयोजकांतर्फे अशोक देशपांडे यांनी कळविले आहे.
सहजीवन व्याख्यानमाला रविवारपासून
पुणे : सहकारनगरमधील प्रसिद्ध सहजीवन व्याख्यानमाला २२ ते २८ मे दरम्यान असेल. सारंग सोसायटीजवळील मुक्तांगण बालरंजन केंद्र येथे रोज सायंकाळी ६.३० ते रात्री ८.३० दरम्यान व्याख्याने होतील. व्याख्यानमालेचे यंदाचे २१ वे वर्ष आहे. डॉ. दिलीप देवधर, बाळासाहेब अनास्कर, सुनील लिमये, कौशल इनामदार, डॉ. कल्याणी नामजोशी, डॉ. गो. बं. देगलूरकर यांची व्याख्याने होणार आहेत. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन व्याख्यानमालेचे अध्यक्ष विनय कुलकर्णी यांनी केले.