
पर्यावरणाची अनुभूती देणारे ‘इनस्केप को-वर्क’ स्टार्टअप विश्व - लोगो
पुणे, ता. १९ : कामाचे ठिकाण किती प्रसन्न आणि पर्यावरणपूरक आहे, याचा कामावर आणि आरोग्यावरदेखील परिमाण होत असतो. त्यामुळे आपले ऑफिस पर्यावरणाशी सुसंगत आणि आरोग्याला फायदेशीर असावे या संकल्पनेतून ‘इनस्केप को-वर्क’ (inscapecowork) मार्फत को-वर्किंग स्पेस निर्माण करण्यात आले आहे.
शहरातील व्यावसायिक व गृहनिर्माण उद्देशांसाठी ग्रीन व्ह्यू असणाऱ्या स्मार्ट जागांची मागणी वाढली आहे. कोविड-१९ चा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून व्यावसायिक क्षेत्रांमध्ये हायब्रीड व घरूनच काम करण्याच्या पद्धतीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे अनेक नोकरदार किंवा छोटे व्यावसायिक आरोग्याची काळजी घेत को-वर्किंगस्पेसमध्ये काम करीत आहेत. ही काळजी केवळ आरोग्यापुरतीच मर्यादित नसून, संपूर्ण वातावरण कर्मचाऱ्यांच्या स्वास्थ्याशी अनुकूल असले पाहिजे, अशी अपेक्षा अनेकांची असते. त्यांच्यासाठी हे स्टार्टअप महत्त्वाचे ठरत आहे. सीए निशांत सोमानी यांनी अनोख्या पद्धतीने डिझाइन करून हे स्टार्टअप सुरू केले आहे. प्रत्येक खोलीमधून झाडांची हिरवळ दिसेल, कामाच्या ठिकाणी चांगले वातावरण असेल व ऑफिस पर्यावरणाशी सुसंगत असेल, अशी काळजी या स्टार्टअपने घेतली आहे. तसेच चहा-कॉफी ऐवजी येथे आरोग्याला चांगले असेल असे पेय दिले जाते.
कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर सुरू केले स्टार्टअप
सोमानी हे २०१८ साली दुबईमधील एका बड्या आंतरराष्ट्रीय कंपनीत मुख्य खजिनदार होते. कॉर्पोरेट नोकरी सोडल्यानंतर आरोग्यावर आधारित को-वर्किंग क्षेत्र सुरू करण्यासाठी ते पुण्यात आले. उत्पादकता व मानसिक स्वास्थ्य सुधारणारे ऑफिस सुरू करण्याच्या ते विचारात होते. आपल्या मानसिक स्थितीचा कामाच्या ठिकाणी आपल्या उत्पादकतेवर लक्षणीय परिणाम होतो. या विचारातून सोमानी यांनी हे स्टार्टअप सुरू केले.
आमचे स्टार्टअप आरोग्याला पूरक ठरेल अशी कार्यालयीन जागा उपलब्ध करून देते. जी शाश्वत उत्पादकतेसाठी ग्राहकाचे आरोग्य व स्वास्थ्याशी संबंधित आहे. इनस्केप ग्राहकांना एक संधी कामकाजाचा अनुभव देण्यासोबत ॲर्गोनॉमिक सुविधा पुरवते. ज्यामुळे कार्यालयामध्ये प्रसन्न वातावरण तयार होते. निसर्गापासून प्रेरित होत को-वर्किंग क्षेत्र बायोफिलियाचादेखील वापर करते. कार्यालयांमध्ये येणाऱ्यांना शुद्ध व ताजी हवा देण्यासाठी झाडांच्या पानांसह फर्निशिंग करण्यात आले आहे.
- सीए निशांत सोमानी, मनीष अग्रवाल,
भागीदार, इनस्केप को-वर्किंग
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c25236 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..