दस्तनोंदणी कार्यालयांत ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर अखेर नागरिकांना सुविधा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Drinking Water
दस्तनोंदणी कार्यालयांत ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर अखेर नागरिकांना सुविधा

दस्तनोंदणी कार्यालयांत ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर अखेर नागरिकांना सुविधा

पुणे - शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयातील दुरवस्थेकडे ‘सकाळ’ने लक्ष वेधल्यानंतर नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने त्याची दखल घेतली. पाण्याची सुविधा, स्वच्छतागृहांची साफसफाई, बसण्यासाठी जागा आदी सुविधा पुरविण्याच्या सूचना मुद्रांक जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार नागरिकांना सुविधा देण्याची कार्यवाही सुरू केली आहे.

पुणे शहरात २८ दुय्यम निबंधक कार्यालय आहेत. दस्तनोंदणीसाठी या कार्यालयात मोठी गर्दी असते. दरवर्षी एकट्या पुणे शहरातून राज्य सरकारला मुद्रांक शुल्कापोटी सहा हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र, नागरिकांना कोणत्याही सुविधा मिळत नाही. याबाबत ‘सकाळ’ने पुढाकार घेत या कार्यालयांची पाहणी करून तेथील दुरवस्था व नागरिकांचे होणारे हाल यावर प्रकाश टाकला होता. त्यांची दखल नोंदणी महानिरीक्षक श्रावण हर्डीकर आणि मुद्रांक जिल्हाधिकारी यांनी घेतली.

मुद्रांक जिल्हाधिकारी अनिल पारखे यांनी या सर्व दस्तनोंदणी कार्यालयांना भेट देऊन पाहणी केली. ज्या ठिकाणी या सुविधा नाहीत, त्या तातडीने उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच, या सुविधा तातडीने पुरविण्यात याव्यात, असे पत्रक काढून दुय्यम निबंधकांना आदेश दिले. त्यानुसार कार्यवाही सुरू झाली आहे.

शहरातील २८ दुय्यम निबंधक कार्यालयांची पाहणी केली आहे. दस्तनोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना सुविधा देण्याचे आदेश दुय्यम निबंधकांना दिले आहेत. त्यानुसार या कार्यालयांमध्ये सुविधा देण्याची कार्यवाही सुरू झाली आहे.

- अनिल पारखे, मुद्रांक जिल्हाधिकारी

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57079 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :punewateroffice
go to top