पुणे मनपा कामगार बॅंकेचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को-ऑप. अर्बन बॅंक
पुणे मनपा कामगार बॅंकेचा सन्मान

पुणे मनपा कामगार बॅंकेचा सन्मान

पुणे : सलग तीन वर्षे निव्वळ थकबाकी निरंक राखल्याबद्दल पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन सर्व्हंट्स को-ऑप. अर्बन बॅंकेला गौरविण्यात आले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते बॅंकेला पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुणे जिल्हा नागरी सहकारी बॅंक असोसिएशनच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर येथे बॅंकिंग क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बॅंकांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, राज्य सहकारी बॅंकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांची प्रमुख उपस्थिती होती. बॅंकेचे अध्यक्ष रामदास गायकवाड, संचालक अंकुश कदम, सुवर्णा रेणुसे, सुनील कांबळे, बाळासाहेब उंदरे, तनुजा रावळ, सुनील पोमण, हनुमंत खेडेकर, सरव्यवस्थापक प्रशांत कांबळे, व्यवस्थापक सुदेश बनकर आदी या वेळी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57439 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top