‘महाज्योतीतील मंजूर पदांची भरती करावी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘महाज्योतीतील मंजूर पदांची भरती करावी’
‘महाज्योतीतील मंजूर पदांची भरती करावी’

‘महाज्योतीतील मंजूर पदांची भरती करावी’

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (महाज्योती) स्थापना होऊन आता साडेतीन वर्षे होत आहेत. मात्र, महाज्योतीचा कार्यभार केवळ एक सरकारी अधिकारी आणि तीन कंत्राटी अधिकाऱ्यांवर चालवला जात आहे. त्यामुळे कामकाज वेळेत होत नसून, विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे मंजूर पदांची भरती करून महाज्योतीला आधार द्यावा, अशी मागणी ओबीसी युवा अधिकार मंचाने केली आहे. या मागण्यांचे निवेदन मंचाने नुकतेच संचालक प्रा. दिवाकर गमे यांना दिले. या वेळी मंचाचे पीयूष आकरे, निकेश पिने, प्रतीक बावनकर, गौतम कावरे, विशाल पटले, मनीष गिराडकर आदी उपस्थित होते.

राज्यातील ५० टक्क्यांपेक्षा अधिक समाजासाठी महाज्योती काम करते. त्यामुळे कामाचा ताण अधिक आहे. महाज्योतीच्या योजना वेळेत आणि प्रभावी पद्धतीने समाजापर्यंत पोचणे गरजेचे आहे. कामकाज व्यवस्थितरित्या पार पाडावे म्हणून दर्जेदार, तज्ज्ञ व्यक्तींची भरती करणे आवश्यक आहे. मागील दोन वर्षांत कुठलीही पदभरती झाली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. परिणामी, महाज्योतीमध्ये तत्काळ पदभरती होणे आवश्यक आहे, असे मंचाचे म्हणणे आहे.

महाज्योतीतर्फे ७ डिसेंबर २०२१ पासून ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी समाजाच्या १२ हजार विद्यार्थ्यांना आयआयटी, जेईई, नीट २०२३ साठी ऑनलाइन प्रशिक्षण सुरू आहे. या प्रशिक्षणात विद्यार्थ्यांना टॅब्लेट्स, ६ जीबी इंटरनेट डेटा आणि पुस्तके दिली जाणार आहेत. मात्र, चार महिने होऊनही या विद्यार्थ्यांना यापैकी काहीही मिळाले नाही. याची तत्काळ पूर्तता करावी. अशीही मागणी मंचाने केली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57728 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top