शिवनेरी रिक्षा संघटनेकडून घंटानाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवनेरी रिक्षा संघटनेकडून घंटानाद
शिवनेरी रिक्षा संघटनेकडून घंटानाद

शिवनेरी रिक्षा संघटनेकडून घंटानाद

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : रिक्षांच्या मीटरदरात वाढ व्हावी, शहरांतील बेकायदेशीर बाईकटॅक्सी बंद व्हाव्यात यांसह अन्य मागण्यांसाठी शिवनेरी रिक्षा संघटनेच्या वतीने बुधवारी जेधे चौक येथे घंटानाद आंदोलन करण्यात आले. या वेळी रिक्षाचालकांनी घंटेचा नाद करून सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला. सरकारने १५ वर्षांवरील वाहनांसाठी ग्रीनटॅक्सच्या रक्कमेत वाढ केली आहे. तसेच पासिंगची मुदत संपलेल्या वाहनचालकांना दंडाच्या रकमेत वाढ केली आहे. केलेली वाढ अन्यायकारक आहे. त्यामुळे ती त्वरित रद्द करण्यात यावी. शिवाय रिक्षाचालकांचा मुक्त परवाना बंद करण्यात यावा, आदी मागण्यासाठी हे आंदोलन केल्याचे संघटनेचे अध्यक्ष अशोक साळेकर यांनी सांगितले. या वेळी प्रतीक साळेकर, आबा बाबर, राजेंद्र कोंढरे, राजेंद्र आढाव आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57739 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top