बॅकस्टेज कलावंतासाठीचा ‘द बर्मन इरा’ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बॅकस्टेज कलावंतासाठीचा 
‘द बर्मन इरा’ उत्साहात
बॅकस्टेज कलावंतासाठीचा ‘द बर्मन इरा’ उत्साहात

बॅकस्टेज कलावंतासाठीचा ‘द बर्मन इरा’ उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. २७ ः बॅकस्टेज कलावंतांसाठीच्या निधी संकलनासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीच्या सहकार्याने रोटरी सॅटेलाईट क्लब ऑफ म्युझिक अँड आर्ट यांच्यातर्फे ‘द बर्मन इरा’ या कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
टिळक स्मारक मंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात प्रतिभावंत संगीतकार बर्मन पिता-पुत्रांना गायक हृषिकेश रानडे आणि गायिका सावनी रवींद्र यांनी मानवंदना दिली. हृषिकेशने ‘तेरे मेरे सपने’, ‘ओ मांझी रे’, ‘रूप तेरा मस्ताना’, ‘बचना ए हसीनों’ तर सावनीने ‘रैना बीती जाएं’, ‘काँटा लगा’, ‘रात अकेली हैं’, ‘आओ ना गले लगा’ आदी गाणी सादर केली. दोघांनी गायलेल्या ‘चुनरी संभाल’, ‘हाल कैसा है’ या द्वंदगीतांना रसिकांची उत्स्फूर्त दाद मिळाली. बासरीवादक अमर ओक आणि सॅक्सोफोनवादक अनिल करमरकर यांनीही बर्मन पितापुत्रांच्या अजरामर स्वररचना पेश केल्या. त्यांना की-बोर्डवर केदार परांजपे, अनय गाडगीळ, गिटारवर विजय मूर्ती, विशाल थेलकर, तबल्यावर विक्रम भट, तालवाद्यांवर अपूर्व द्रविड आणि वेस्टर्न रिदमवर अभिजित भदे यांनी साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन संजय गंभीर यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57768 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top