गुन्हे वृत्त (२ बातम्या) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गुन्हे वृत्त (२ बातम्या)
गुन्हे वृत्त (२ बातम्या)

गुन्हे वृत्त (२ बातम्या)

sakal_logo
By

मोटारीच्या सायलेन्सर चोरीचे १४ गुन्हे उघड

पुणे, ता. २७ : मोटारीचे सायलेन्सर चोरणाऱ्या टोळीला लोणीकाळभोर पोलिसांनी अटक केली. शहर आणि जिल्ह्यात सायलेन्सर चोरी केल्याचे १४ गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले असून, तीन लाख ६० हजारांचे सायलेन्सर जप्त करण्यात आल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली.
शिवप्रसाद पंढरीनाथ रोकडे (वय २१) आणि राम राजेश ढोले (वय २०, दोघेही रा. आळंदी, ता. खेड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. लोणी काळभोर पोलिसांनी त्यांच्याकडून सायलेन्सर चोरीचे १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. आरोपींनी हडपसर, कोंढवा, विमानतळ, येरवडा आणि सासवड परिसरातून सायलेन्सर चोरल्याचे तपासात समोर आले आहे. न्यायालयाने दोघा आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.
अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण, उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलिस निरीक्षक सुभाष काळे, सहायक निरीक्षक राजू महानोर, संतोष होले, सुनील नागले, नितीन गायकवाड, अमित साळुंखे आदींनी ही कारवाई केली.

विवाहाचे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार

पुणे, ता. २७ : विवाहाचे आमिष दाखवून एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. याप्रकरणी महिलेने फिर्याद दिल्यावरून एका तरुणाच्या विरोधात मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सनी सुनील छजलानी (वय ३३, रा. केशवनगर, मुंढवा) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी छजलानी याचा विवाह झाला आहे. परंतु त्याने महिलेला अविवाहित असल्याचे सांगितले. तसेच, त्याने विवाह करण्याचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार केला. या महिलेने विवाह करण्याबाबत विचारले असता आरोपीने तिला मारहाण करुन धमकी दिली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57783 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top