‘पीयूसी’च्या दरात अकरा वर्षांनी वाढ आजपासून अंमलबजावणी होणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पीयूसी’च्या दरात 
अकरा वर्षांनी वाढ
आजपासून अंमलबजावणी होणार
‘पीयूसी’च्या दरात अकरा वर्षांनी वाढ आजपासून अंमलबजावणी होणार

‘पीयूसी’च्या दरात अकरा वर्षांनी वाढ आजपासून अंमलबजावणी होणार

sakal_logo
By

पुणे, ता. २७ : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत राहिलेले पीयूसीच्या दरवाढीस परिवहन विभागाने मान्यता दिली. नव्या दराची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उद्यापासून (गुरुवार) पुण्यात नव्या दराने पीयूसी चाचणी केली होईल. १६ मार्च २०११ नंतर पहिल्यांदाच पीयूसीच्या दरात वाढ झाली आहे.
पुण्यात जवळपास पीयूसीचे शंभर केंद्र आहेत. यातील काही केंद्रे ही फिरते आहेत तर काही केंद्रे एकाच ठिकाणी आहेत.
वाहनांचा प्रकार ः जुने दर नवे दर
दुचाकी ः ३५ ५०
पेट्रोलवरील तीन चाकीवाहन ः ७० १००
चारचाकी (पेट्रोल, सीएनजी, एलपीजी ) ः ९० १२५
डिझेलवरील वाहने ः ११० १५०
डिझेलवरील वाहने ः ११० १५०

पीयूसी नसल्यास चार हजारांचा दंड :
मोटार वाहन कायद्यातील दंडाच्या नव्या तरतुदीनुसार, वाहनाचा पीयूसी नसेल तर चार हजार रुपयांचा दंड आकारला जातो. आधी दंडाची रक्कम एक हजार रुपये होती. नव्या तरतुदीत दंडाची रक्कम तीन हजाराने वाढविण्यात आली.
पीयुसीचे प्रमाण कमी :
पुण्यात जवळपास सर्व प्रकारच्या वाहनांची संख्या ही ४० ते ४५ लाख इतकी आहे. यात दुचाकीची संख्या सर्वाधिक आहे. नवीन गाडी घेतल्यावर पीयूसी काढणे अनिवार्य असते. त्याशिवाय वाहनांची नोंदणी होत नाही. दोन वर्षानंतर अनेक दुचाकीचालक पीयूसी काढण्याकडे दुर्लक्ष करतात. जवळपास ७० टक्के वाहनांची पीयूसी नसते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c57829 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top