
‘आयसर’च्या प्रवेश परीक्षेसाठी आजपासून अर्ज
पुणे : भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेच्या (आयसर) प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यास शुक्रवार (ता. २९) पासून सुरुवात होत आहे. ‘आयसर’च्या वतीने अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ खुले केले जाणार आहे. विज्ञान शिक्षणासाठी नावाजलेल्या ‘आयसर’च्या प्रवेश परीक्षेची अर्थात आयएटी-२०२२ची घोषणा करण्यात आली आहे. पदवी आणि पदव्युत्तर इंटिग्रेटेड अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा देशभरात घेण्यात येणार आहे.
बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रमानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थी आयसरमध्ये प्रवेशासाठी पात्र ठरतात. प्रज्ञावान विद्यार्थ्यांना मूलभूत विज्ञान शिक्षणाबरोबरच संशोधनात्मक दृष्टिकोनात वाढ व्हावी, म्हणून देशभरात सात ‘आयसर’ची स्थापना करण्यात आली आहे.
पाच वर्षांच्या ‘बॅचलर इन सायन्स-मास्टर इन सायन्स’ (बीएस-एमएस) अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. आयसर भोपाळमध्ये चार वर्षांचा अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्रातील पदवी अभ्यासक्रमही उपलब्ध करण्यात आला आहे. पुण्यासह ब्रह्मपूर, भोपाळ, मोहाली, कोलकता, तिरूअनंतपुरम, तिरुपती येथे आयसरचे संकुले आहेत.
प्रवेश परीक्षेची पात्रता
- बारावी किंवा समकक्ष अभ्यासक्रमांच्या शेवटच्या वर्षाला किंवा उत्तीर्ण
- खुला आणि ओबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना ६० टक्के आवश्यक
- एससी, एसटी, पीडब्ल्यूडी प्रवर्गातील विद्यार्थ्याला ५५ टक्के गुण आवश्यक
महत्त्वाचे
- प्रवेश परीक्षेची (आयएटी-२०२२) तारीख : ३ जुलै
- संकेतस्थळ ः http://www.iiseradmission.in/
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58018 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..