महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ध्वजवंदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ध्वजवंदन
महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ध्वजवंदन

महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ध्वजवंदन

sakal_logo
By

पुणे, ता. २८ : महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या वर्धापन दिनानिमित्त रविवारी (ता. १) सकाळी आठ वाजता शिवाजीनगर येथे पोलिस संचलन मैदानावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ध्वजवंदनाचा मुख्य समारंभ होणार आहे.
राष्ट्रध्वजास मानवंदना तसेच पोलिस दल, गृहरक्षक दल, नागरी संरक्षण दलाकडून संयुक्त संचलन होणार आहे. शहरातील राज्य सरकारचे विभाग प्रमुख, कार्यालयीन प्रमुख आणि विविध क्षेत्रातील व्यक्तींनी समारंभास सकाळी ७.४५ वाजता उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी हिम्मत खराडे यांनी केले आहे. निमंत्रितांना मुख्य सरकारी समारंभात सहभागी होता यावे, यासाठी सकाळी ७.१५ ते ९ या कालावधीत ध्वजवंदन किंवा इतर सरकारी कार्यक्रम आयोजित करण्यात येऊ नये, अशा सूचना खराडे यांनी दिल्या आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58036 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top