शास्त्रीय दृष्टीकोनातून क्षमताविकास गरजेचा माजी खासदार प्रदीप रावत यांचे मत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शास्त्रीय दृष्टीकोनातून 
क्षमताविकास गरजेचा
माजी खासदार प्रदीप रावत यांचे मत
शास्त्रीय दृष्टीकोनातून क्षमताविकास गरजेचा माजी खासदार प्रदीप रावत यांचे मत

शास्त्रीय दृष्टीकोनातून क्षमताविकास गरजेचा माजी खासदार प्रदीप रावत यांचे मत

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः ‘कुटुंबासाठी ज्या ममत्त्वाने काम केले जाते, त्याच भावनेने समाजासाठी कार्य केले पाहिजे. भूतकाळाचे ओझे न बाळगता वर्तमानकाळात शास्त्रीय दृष्टिकोन बाळगून आणि लक्ष्य निर्धारित करून क्षमता वाढवणे गरजेचे आहे’, असे मत माजी खासदार प्रदीप रावत यांनी नुकतेच व्यक्त केले. पुणे महापालिकेचे पहिले आयुक्त स. गो. बर्वे यांच्या १०८ व्या जयंतीनिमित्त स. गो. बर्वे न्यासातर्फे आयोजित स्नेहमेळाव्यात ‘शास्त्रीय दृष्टिकोन व समाजकार्य’ या विषयावर रावत यांचे व्याख्यान झाले, त्यावेळी ते बोलत होते. बर्वे यांच्या जीवन कार्याचा परामर्ष घेणाऱ्या डॉ. श्री. ग. बापट लिखित व यशश्री पुणेकर संपादित ‘अर्धविरामा’चे सिंहावलोकन! या पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी रावत यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी बर्वे चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त बळवंत बर्वे, भूषणा करंदीकर, मकरंद केळकर आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58099 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top