‘समर्थव्रती चिंचोलकर’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘समर्थव्रती चिंचोलकर’
पुस्तकाचे प्रकाशन
‘समर्थव्रती चिंचोलकर’ पुस्तकाचे प्रकाशन

‘समर्थव्रती चिंचोलकर’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः आज समाज जागवण्याची आणि प्रभू श्री रामांसारखा पराक्रम गाजवण्याची आवश्यकता आहे. आज पराक्रम गाजवला नाही तर, येणारा काळ अवघड आहे, असे मत अयोध्या श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र (न्यास)चे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांनी नुकतेच व्यक्त केले. मोरया प्रकाशनातर्फे ‘समर्थव्रती सुनील चिंचोलकर’ या पुस्तकाचे प्रकाशन भरत नाट्य मंदिर येथे स्वामी गोविंददेव गिरी महाराज, रामकृष्ण मठाचे अध्यक्ष स्वामी श्रीकान्तानंद, ज्येष्ठ प्रवचनकार कल्याणी नामजोशी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी लेखक दिलीप महाजन, डॉ. अपर्णा चिंचोलकर-गोस्वामी उपस्थित होते. यावेळी दासबोध विवरण संचाचेही प्रकाशन झाले. स्वामी श्रीकान्तानंद, कल्याणी नामजोशी यांनी मनोगत व्यक्त केले. गौरी देव-महाजन यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58107 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top