पुण्यात पारा चाळीशी पार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात पारा चाळीशी पार
पुण्यात पारा चाळीशी पार

पुण्यात पारा चाळीशी पार

sakal_logo
By

पुणे, ता. २८ ः शहरात गेल्या दोन दिवसांपासून उष्णतेच्या लाटेसदृश परिस्थिती पाहायला मिळत आहे. पारा ४१ अंशांच्या पुढे गेल्याने उन्हाच्या तीव्र झळांमुळे पुणेकरांच्या अंगाची लाही लाही होत आहे. मागील तीन दिवसांपासून जिल्ह्यात कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या पुढे स्थिर आहे. गुरुवारी शिवाजीनगर येथे ४१.८ अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद झाली. दरम्यान पुढील आठवडाभर शहर आणि परिसरात ही स्थिती कायम राहणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मागील आठवड्यापर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाच्या हलक्या सरींचा अनुभव घेणाऱ्या पुणेकरांना आता अक्षरशः उन्हाच्या झळा असह्य झाल्या आहेत. मागील चार ते पाच दिवसांपर्यंत शहरातील कमाल तापमान ३७ ते ३९ अंशांपर्यंत नोंदले जात होते. मात्र, मंगळवारपासून (ता. २६) शहरातील तापमान चाळीशीच्यावर नोंदले जात आहे. गुरुवारी पुण्यातील काही भागात ४२ ते ४३ अंशा दरम्यान तापमान होते. चिंचवड येथे ४३.६ अंश सेल्सिअस इतकी नोंद झाली. सध्या दिवसभर उन्हाच्या चटक्यांबरोबर रात्री सुद्धा गरम हवा अनुभवायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्यात मे महिन्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, येत्या ४ मे पर्यंत जिल्ह्यात कमाल तापमान ४० अंशांच्या दरम्यान कायम राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन हवामानशास्त्र विभागाने केले.

पुण्यातील कमाल तापमान ः
शिवाजीनगर ः ४१.८
पाषाण ः ४१.८
लोहगाव ः ४१.७
चिंचवड ः ४३.६
मगरपट्टा ः ४२.६

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c58157 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top