बेकायदा गर्भपाताची औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बेकायदा गर्भपाताची औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा
बेकायदा गर्भपाताची औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा

बेकायदा गर्भपाताची औषधे विक्रीप्रकरणी गुन्हा

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : गर्भपाताची औषधे ऑनलाइन विक्री केल्याने ‘अँमेझोन’वर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) सोमवारी दिली.
इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन पोर्टलवर गर्भपातासाठी वापरत येणारी औषधे नियमबाह्य विक्री होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले होते. याची पडताळणी करण्यासाठी विविध ऑनलाइन विक्री पोर्टल्सवर विनाप्रीस्क्रीपशन गर्भपात औषधांची (एमटीपी किट) मागणी नोंदविली होती. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनची मागणी न करता अँमेझोनने ऑनलाइन औषधांची मागणी स्वीकारली. ही औषधे कुरिअरद्वारे मिळाली. या औषधांसोबत विक्री केल्याचे बिल मिळाले नाही.
औषध विक्रीप्रकरणात ‘एफीडीए’ने अँमेझोन सेलर्स सर्व्हिसेसकडून माहिती मागविली. ही औषधे ओरिसा येथून पुरवठा केल्याचे अँमेझोनतर्फे कळविण्यात आले. अमँझोनने पुरविलेल्या माहितीच्या आधारे पुढील तपासात ओरिसा येथील विक्रेत्यांकडे करण्यात आला. त्यातून हे औषध या औषध दुकानातून पुरविले नसून या दुकानाचा औषध विक्री परवाना वापरून इतर व्यक्तीने अँमेझोनच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी केल्याचे आढळून आले, अशी माहिती ‘एफडीए’तर्फे देण्यात आली.


प्रिस्क्रिप्शन औषधांची विक्री धोकादायक
औषधांच्या विक्रीसाठी प्रचलित कायदे व नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे या बाबत खात्री अमँझोनद्वारे केली नाही. डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ज्या औषधांची विक्री करणे रुग्णाच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत धोकादायक आहे अशा गर्भपाताच्या औषधाची विना प्रिस्क्रिप्शन विक्री अमँझोनद्वारे केली आहे. त्यामुळे अँमेझोनवर मुंबई येथे गुन्हा दाखल केला आहे, असेही एफडीए स्पष्ट केले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59298 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top