कॅशलेस वीजबिलभरणाकडे वाढता कल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कॅशलेस वीजबिलभरणाकडे वाढता कल
कॅशलेस वीजबिलभरणाकडे वाढता कल

कॅशलेस वीजबिलभरणाकडे वाढता कल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ३ : कॅशलेस वीजबिल भरण्याकडे राज्यातील वीजग्राहकांचा कल वाढत असल्याचे समोर आले आहे. वीजबिलांच्या रकमेपैकी तब्बल ७४ टक्के रकमेचा भरणा करण्यासाठी ग्राहकांनी ऑनलाइन पर्याय निवडला आहे. वर्षभरात एकूण ५३ हजार ५० कोटी रुपये वीजबिलाचा ऑनलाइन भरणा ग्राहकांनी केला आहे. उच्च दाब ग्राहकांनी ९८ टक्क्यांपेक्षा जास्त रक्कम ऑनलाइन भरणा केली आहे. तर ५८ टक्के लघुदाब ग्राहकांनी ऑनलाइनद्वारे भरणा केला आहे. असे एकूण ७४ टक्के वीजबिलांचा ग्राहकांनी ऑनलाइनद्वारे भरणा केला. ऑनलाइन वीजबिल भरीत असल्यास त्या ग्राहकाला वीजबिलाच्या ०.२५ टक्के किंवा जास्तीत जास्त ५०० रुपये पर्यंत सूट मिळते.
महावितरणने सर्व वर्गवारीतील ग्राहकांना सर्व सेवा डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये सर्व वीज ग्राहकांसाठी www.mahadiscom.in ही वेबसाइट व महावितरण मोबाईल ॲप तसेच उच्चदाब ग्राहकांसाठी स्वतंत्र ‘आरटीजीएस’ सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे दरमहा वीजबिलांचा भरणा ऑनलाइन करण्यासोबतच महावितरणच्या सर्व ग्राहकसेवा देखील लघुदाब व उच्चदाब वर्गवारीतील ग्राहकांसाठी एका क्लिकवर उपलब्ध आहेत. लघुदाब औद्योगिक, वाणिज्यिक व घरगुती ग्राहकांचे वीजबिल १० हजार रुपयांपेक्षा अधिक असल्यास त्यांना आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे थेट वीजबिल भरण्याची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी १० हजारांपेक्षा अधिक रकमेच्या वीजबिलावर महावितरणच्या बँक खात्याचा तपशील देण्यात येत आहे. तर यापेक्षा कमी रकमेच्या बिलांचा भरणा करण्यासाठी महावितरणची अधिकृत वेबसाइट तसेच मोबाईल ॲपची सोय उपलब्ध करून दिली आहे.

काय होतो फायदा?
ऑनलाइन वीजबिल भरणा करणाऱ्यांना ग्राहकांना चालू व मागील वीजबिल पाहणे, पावती पाहणे, एकाच खात्यातून अनेक वीजजोडण्यांचे बिल भरणे यासह इतर सर्व ग्राहक सेवांचा फायदा होतो. तसेच वीजबिलावर छापलेला क्यूआर कोड मोबाईलवर स्कॅन करून ग्राहकांना यूपीआयद्वारे ऑनलाइन पेमेंटची सुविधा आहे. तसेच ग्राहकांना वीजबिल भरण्यासंदर्भात नोंदणीकृत मोबाईल क्रमांकांवर पाठवण्यात येणाऱ्या एसएमएसमध्येही पेमेंटची लिंक देण्यात येत आहे. याबरोबरच भारत बिल पेमेंट सर्व्हिस, ईसीएस/ईबीपीपी/एनएसीएच, सेंट्रलाझ्ड ग्रुप बिल पेमेंट, महापॉवरपे वॉलेट हे मार्गही ऑनलाइन पेमेंटसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही कारणास्तव धनादेश बाऊन्स होणे, तो वटण्यास उशीर होणे किंवा अन्य अडचणी येणे आदी पूर्वीचे अडथळे पूर्णतः दूर झाले आहेत

आकडे बोलतात
- लघुदाब ग्राहकांनी २०२१-२२ मध्ये १९ हजार ३४७ कोटी ५५ लाख रुपयांच्या (४९.४० टक्के) वीजबिलांचा घरबसल्या ऑनलाइन भरणा केला
- उच्चदाब वीजग्राहकांसाठी दरमहा वीजबिल आरटीजीएस किंवा एनईएफटीद्वारे भरण्याची सोय उपलब्ध झाल्याने गेल्या वर्षभरात उच्चदाब ग्राहकांनी ३४ हजार ६०२ कोटी ८८ लाख रुपयांचा (९८.०१ टक्के) भरणा ऑनलाइन केला आहे
- परिमंडलनहाय एकूण वीजबिलांच्या रकमेपैकी ऑनलाइन भरलेली रक्कम व टक्केवारी पुढीलप्रमाणे : पुणे- १०५१०.७३ कोटी (८१.१६ टक्के व बारामती- ४८२४.६७ कोटी (७४.८५ टक्के)

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59444 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top