महिलांमध्ये गुंतवणूक साक्षरता गरजेची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांमध्ये गुंतवणूक साक्षरता गरजेची
महिलांमध्ये गुंतवणूक साक्षरता गरजेची

महिलांमध्ये गुंतवणूक साक्षरता गरजेची

sakal_logo
By

अक्षता पवार : सकाळ वृत्तसेवा
पुणे, ता. ८ : घरातील आजारपण, मुलांचे शिक्षण आणि लग्नासाठी ऐनवेळी पैसे उपलब्ध व्हावेत, यासाठी गृहिणी नेहमीच सोने, पोस्टात एफडी, बचत गट, भिशी अशा ठिकाणी गुंतवणूक करतात. मात्र, बदलत्या काळानुसार आता अधिक परतावा देणाऱ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्याची आवश्‍यकता आहे. याबाबत अजूनही महिलांमध्ये गुंतवणूक साक्षरतेची गरज अधिक असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

वैयक्तिक बचत, सुरक्षित गुंतवणूक, सेवानिवृत्ती, बजेटिंग हे महिलांचे सर्वाधिक आवडीचे विषय. महिलांची पसंती ही सुरक्षित गुंतवणुकीला जास्त असते. त्यामुळे यातून परतावा कमी असला तरी रक्कम सुरक्षित आहे, याची शाश्‍वती असते. त्यामुळे बहुतांश महिला सोनेखरेदी, एफडी, आरडी सारखे पर्याय निवडतात. मात्र, म्युच्युअल फंड व शेअर्समध्ये गुंतवणुकीला प्राधान्य देणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे.

‘सेबी’ रजिस्टर्ड गुंतवणूक सल्लागार नंदिनी वैद्य म्हणाल्या, ‘‘गृहिणी किंवा घरगुती व्यवसाय करणाऱ्याच नाही, तर नोकरी करणाऱ्या महिलांचे गुंतवणुकीकडे पाहण्याचे प्रमाण कमी आहे. मुळात कशात गुंतवणूक करावी, याबाबत त्यांचा जास्त अभ्यास किंवा समजून घेण्याची मानसिकता नसते. बऱ्याचदा त्यांच्या वतीने त्यांचे पती गुंतवणूक करतात. तसेच ऑफिसमधील सहकाऱ्याच्या सांगण्याप्रमाणे पहिल्यांदाच गुंतवणूक करतात. त्यामुळे अशा गुंतवणुकीकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. केवळ ऑफिसद्वारे भविष्यनिर्वाह निधी (पीएफ) सारख्या गोष्टींमुळे थोडीफार गुंतवणूक होत असते. सातत्याने ‘मॉनिटरिंग ऑफ इन्व्हेस्टमेंट’ किंवा नवे काही पर्याय आहेत का, याबाबत केवळ ५ ते ७ टक्के महिलाच विचारतात.’’

महिलावर्ग म्युच्युअल फंड, इन्शुरन्स किंवा शेअर्समध्ये गुंतवणूक फार कमी करतात. कारण याबाबतची माहिती घेणे अथवा ती समजून घेणे त्यांना क्लिष्ट वाटते. पारंपरिक गुंतवणुकीचा अर्थात सोनेखरेदीचा पर्याय जवळपास ५० ते ६० टक्के महिला निवडतात. मात्र, यातून रिटर्न्स किती मिळतात याचा अभ्यास कधीच केला जात नाही.
- चैतन्य गोखले, इन्शुरन्स व इन्व्हेस्टमेंट क्षेत्रातील तज्ज्ञ

आर्थिक उत्पन्नावर गुंतवणुकीचा पॅटर्न ठरतो. आयटी, बँक किंवा इतर कोणत्याही क्षेत्रात काम करत असलेल्या किंवा जास्त उत्पन्न असलेल्या महिला प्रॉपर्टी, शेअर्स, किंवा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याला प्राधान्य देतात. ज्यांचे मासिक उत्पन्न १० ते २० हजार रूपयांदरम्यान आहे, अशा महिला बँकेत, पोस्टात किंवा सोने यामध्ये गुंतवणूक करतात. गृहिणींच्या बाबतीत गुंतवणुकीचे निर्णय प्रामुख्याने पतीच घेतात.’’
- सुधाकर कुलकर्णी, सर्टिफाईड फायनान्शिअल प्लॅनर

आकडे बोलतात
महिलांचे मत (स्रोत- झेस्ट मनी सर्वेक्षण २०२२)
गुंतवणुकीचा पर्याय ः टक्केवारी
सोने व फिक्स्ड डिपॉझिट ः ५९
पगारातून २५ ते ५० टक्के वाचविणे ः ५०
म्युच्युअल फंड किंवा शेअर्स ः ३१
गुंतवणूकीसाठी इंटरनेट व वृत्तपत्रातून मार्गदर्शन घेणे ः ५७

महिलांचा कल
- ८० टक्के महिलांची २०२२ साठी लक्ष्याभिमुख आर्थिक उद्दिष्टे निश्चिती
- ४६ टक्के महिलांचे हप्त्यांवर वस्तू खरेदीस प्राधान्य

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59470 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top