भाजप शिष्टमंडळाने वाचला तक्रारींचा पाढा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाजप शिष्टमंडळाने वाचला तक्रारींचा पाढा
भाजप शिष्टमंडळाने वाचला तक्रारींचा पाढा

भाजप शिष्टमंडळाने वाचला तक्रारींचा पाढा

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मागील आठवड्यात महापालिका बरखास्त झाली तरी महापालिकेत जात रहा, नागरिकांचे प्रश्‍न मांडा, तुम्ही नगरसेवक आहात असेच समजा आणि काम करा, असे आदेश दिल्यामुळे सोमवारी (ता. २) भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेतली. शहरातील खड्डे, डासांचा त्रास, पाणी टंचाई यासह इतर प्रश्‍नांवर तक्रारींचा पाढा वाचला. त्यावर आयुक्तांनी सर्व प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्यवाही सुरू असल्याचे आश्‍वासन दिले.

दरम्यान, आयुक्तांनी या समस्यांवर कार्यवाही सुरू असल्याचे सांगितले. नव्याने रस्ते खोदाई करू नये व ३१ मे पर्यंत शहरातील रस्ते पुर्ववत करण्यात येतील. वेगाने जलपर्णी काढण्याची कार्यवाही सुरू आहे, त्यामुळे डासांचा त्रास कमी होईल असे आश्‍वासन दिले.

गेले पाच वर्ष महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भाजपने शहरातील समस्या मांडून त्याकडे प्रशासकाचे लक्ष वेधले. यावेळी शहराध्यक्ष जगदीश मुळीक, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, माजी सभागृहनेते गणेश बिडकर, दत्ता खाडे, दीपक पोटे, गणेश घोष, दीपक नागपुरे, राजेश येनपुरे, संदीप खर्डेकर आदी उपस्थित होते.

पत्रकार परिषदेत जगदीश मुळीक म्हणाले, ‘‘महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती केल्याने नागरिकांच्या समस्या मांडण्याचे नगरसेवकांचे व्यासपीठ असलेली सर्वसाधारण सभा होत नाही. यामुळे नागरिकांच्या प्रश्‍नांना वाचा फुटत नसल्याने महापालिका आयुक्तांची भेट घेतली. मुळामुठा नदीत वाढलेल्या जलपर्णीमुळे परिसरातील नागरिकांना डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. शहराच्या विविध भागात रस्ते खोदले आहेत. अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.''''

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59481 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top