फसवणूकप्रकरणी जामीन फेटाळला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

फसवणूकप्रकरणी जामीन फेटाळला
फसवणूकप्रकरणी जामीन फेटाळला

फसवणूकप्रकरणी जामीन फेटाळला

sakal_logo
By

पुणे, ता. ४ : भागीदारीत पब-हॉटेल चालविताना सुमारे दोन कोटींचा अपहार करून भागीदारांची फसवणूक केली, याप्रकरणी हॉटेलचालकाचे वडील व भावाचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने फेटाळला. सत्र न्यायाधीश जी. पी. अगरवाल यांनी हा आदेश दिला. किशोरकुमार श्रीनिवास शेट्टी (वय ६३) आणि नील किशोर शेट्टी (वय २२) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला. त्यांच्यासह अंशुल किशोर शेट्टी (वय २८, तिघेही रा. प्रभात रस्ता, एरंडवणा) याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याबाबत विश्‍वजीतराजे नाईक निंबाळकर यांनी फिर्याद दिली. ही घटना जुलै २०१९ ते फेब्रुवारी २०२० दरम्यान राजाबहादूर मिल कंपाउंड परिसरात घडली.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59487 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top