केआयआयटी विद्यापीठ इम्पॅक्ट रॅकिंगमध्ये आठवे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केआयआयटी विद्यापीठ इम्पॅक्ट रॅकिंगमध्ये आठवे
केआयआयटी विद्यापीठ इम्पॅक्ट रॅकिंगमध्ये आठवे

केआयआयटी विद्यापीठ इम्पॅक्ट रॅकिंगमध्ये आठवे

sakal_logo
By

भुवनेश्‍वर, ता. ३ ः येथील केआयआयटी विद्यापीठाला शाश्‍वत विकासाची ध्येये (सीडीजी) गाठण्यातील योगदानाबद्दल टाइम्स हायर एज्युकेशन इम्पॅक्ट रॅकिंगमध्ये जगातील सर्व विद्यापीठांमध्ये आठवा क्रमांक मिळाला आहे. ‘विषमता कमी करणे’ हे ध्येय गाठल्याबद्दल २८ एप्रिलला प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये विद्यापीठाला हा क्रमांक दिला गेला. या यादीमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या शाश्‍वत विकासाची ध्येये गाठण्यामधील योगदानाला अधिक महत्त्व दिले जाते.
केआयआयटीने जगभरातील १०६ देशांतील एक हजार ५०० विद्यापीठांशी स्पर्धा करताना दर्जेदार शिक्षण, शांतता, न्याय आणि ध्येये गाठण्यातील सहभाग या निकषांमध्ये चांगली कामगिरी केली. या यादीमध्ये भारतातील मोजक्याच संस्था असून, या यादीतील आठ भारतीय संस्थांमध्ये केआयआयटीने पहिला क्रमांक मिळवला आहे. ही संस्था दर्जेदार शिक्षण आणि संशोधनाव्यतिरिक्त सामाजिक विकासाच्या कामांतही योगदान देत आहे. संस्थेने विषमता दूर करण्यासाठी केलेल्या कामासाठी तिला यादीमध्ये वरचे स्थान मिळाल्याचे सांगण्यात आले. या संदर्भात अच्युत सामंथा म्हणाले, ‘‘विषमता कमी करण्याच्या कामात संस्थेने गेली अनेक वर्षे मोलाचे योगदान दिले आहे. मी कुलपती, कुलगुरू, प्राचार्या सस्मिता सामंथा, सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतो.’’

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59591 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top