पुण्यात रमजान ईद उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात रमजान ईद उत्साहात
पुण्यात रमजान ईद उत्साहात

पुण्यात रमजान ईद उत्साहात

sakal_logo
By

पुणे, ता. ३ ः पुण्यात मंगळवारी मुस्लिम बांधवांनी रमजान ईद उत्साहात साजरी केली. गोळीबार मैदानावर (ईदगाह मैदान) एकत्र येत सामुदायिक नमाज पठण करण्यात आले. नमाज पठण केल्यानंतर एकमेकांना गळा भेट देत ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. मुलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.
सकाळी ८.३० पहिली व दुसरी नमाज ९.३० या वाजता पठण करण्यात आली. दोन्ही नमाजाला हजारो बांधव उपस्थित होते. कोरोनानंतर तब्बल दोन वर्षे देशात कोणताच सण उत्साहात साजर करण्यात आला नव्हता. दरम्यान, सोमवारी चंद्रदर्शन झाल्यानंतर देशभरातील मुस्लिमांचा सर्वांत मोठा व पवित्र ‘रमजान ईद’ सण उत्साहाने साजरा झाला.
या वेळी ईदगाह ट्रस्टचे झैनुल काझी, पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता, आमदार सुनील कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष प्रशांत जगताप, मोहन जोशी, बाळासाहेब शिवरकर आदी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते गुलाबपुष्पांचे वाटप करून बांधवांना शुभेच्छा दिल्या. या वेळी पाण्याचे टॅंकर तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
पोलिसांकडून कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नमाज पठणानंतर मुस्लिम बांधवांना सर्वधर्मीयांनी गळा भेट घेत शुभेच्छा दिल्या.

कोरोना योद्ध्यांना श्रद्धांजली
कोरोना काळात रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेताना संसर्ग होऊन मृत्यू पावलेल्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी यांना मुस्लिम बांधवांनी श्रद्धांजली वाहिली. तसेच बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांना मिठाईचे वाटप केले, असे मुस्लिम आवकाफ ट्रस्टचे कार्याध्यक्ष मुस्ताख पटेल यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59647 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top