
आत्मशोधातून व्हावे आत्मप्रकटीकरण : डॉ. रामचंद्र देखणे
पुणे, ता. ३ : ‘कथा, कविता आणि कादंबरीतून ललित साहित्याचे समृद्ध दालन उभे राहते. संवेदनांच्या जाणिवा जेव्हा अनुभूतीच्या परिघाने विस्तारतात तेव्हा कादंबरी जन्म घेते; तर अनुभवाच्या पाठीमागे दडलेली लौकिक जाणीव आत्मशोधातून आत्मकथेला जन्म देते म्हणून आत्मशोधातून आत्मप्रकटीकरण व्हावे, अशी अपेक्षा प्रसिद्ध साहित्यिक आणि संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.
निवृत्त जिल्हा न्यायाधीश उत्तम दिक्कतवार यांच्या ‘पाउले चालती’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
बालशिक्षण मंडळाच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री पावश गणपती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर रायबागकर होते. यावेळी नगरसेवक दिलीप बराटे, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मधुकर पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे, प्रा. सुधीर पिटके आदी उपस्थित होते. पुस्तकविक्रीतून मिळणारा निधी श्री पावशा गणपती ज्येष्ठ नागरिक संघास मदतीच्या रूपाने दिला जाणार आहे.
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59660 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..