
डेटा सायन्समधील करिअर संधी!
डेटा सायन्समधील करिअर संधी!
डेटा अॅनालिटिक्स ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे वेगवेगळे टूल्स वापरून डेटा तयार केला जातो, त्याचे विश्लेषण केले जाते आणि तो प्रसंगी साफ केला जातो. हा डेटा नंतर इन्साईट्स मिळविण्यासाठी वापरला जातो. या इन्साईट्स नंतर व्यवसायाशी संबंधित निर्णय घेण्याच्या हेतूंसाठी वापरल्या जातात.
कंपन्या आता अधिक तंत्रज्ञान-चालित (टेक-ड्रिव्हन) आणि वेगवान होत असल्याने, व्यवसायांमध्ये डेटा अनॅलिसिस प्रोफेशनल्स वाढत्या प्रमाणात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहेत. भारतातील स्टार्टअप्स आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपन्या डेटा अनॅलिस्ट्स कर्मचाऱ्यांना स्वतःशी जोडून घेत आहेत, जे कार्यक्षम निर्णय घेण्यासाठी डेटा रेकॉर्डिंग, विश्लेषण आणि अगदी खोलात जाऊन त्याचे विच्छेदन (चीर-फाड) करण्यास सक्षम आहेत.
२०२२ मध्ये एकूण डेटा पूर्वीपेक्षा ५० पटीने अधिक होण्याचा अंदाज आहे. कंपन्यांना मोठ्या प्रमाणातील डेटाच्या उपलब्धतेसह अद्ययावत राहावे लागेल जेणेकरून त्या स्पर्धेत मागे राहणार नाहीत. म्हणून, डेटा अनॅलिसिसमध्ये पारंगत असलेले तज्ज्ञ (डेटा अनॅलिस्ट) कंपन्यांना उपलब्ध डेटा विश्लेषणानुसार त्यांचे व्यवसाय मॉडेल ऍडजस्ट करण्यासाठी आणि स्पर्धेच्या वातावरणात नेहमीच एक पाऊल पुढे राहण्यासाठी महत्त्वपूर्ण मानले जातात.
यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सोबतचा क्यूआर कोड स्कॅन करा. (नंबर-------६१६७९)
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59680 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..