‘पाउले चालती’ पुस्तकाचे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘पाउले चालती’ पुस्तकाचे प्रकाशन
‘पाउले चालती’ पुस्तकाचे प्रकाशन

‘पाउले चालती’ पुस्तकाचे प्रकाशन

sakal_logo
By

पुणे, ता. ४ ः ‘‘संवेदनांच्या जाणिवा जेव्हा अनुभूतीच्या परिघाने विस्तारतात, तेव्हा कादंबरी जन्म घेते, तर अनुभवाच्या पाठीमागे दडलेली लौकिक जाणीव आत्मकथेला जन्म देते. त्यामुळे आत्मशोधातून आत्मप्रकटीकरण व्हावे,’’ अशी अपेक्षा संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांनी व्यक्त केली.

निवृत्त न्यायाधीश उत्तम दिक्कतवार यांच्या ‘पाउले चालती’ या आत्मकथनपर पुस्तकाचे प्रकाशन डॉ. देखणे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री पावश गणपती ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष मुरलीधर रायबागकर, नगरसेवक दिलीप बराटे, मध्यवर्ती ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष मधुकर पवार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्यवाह वि. दा. पिंगळे तसेच प्रा. सुधीर पिटके आदी उपस्थित होते. इष्टापत्तीतून हे पुस्तक घडल्याचे दिक्कतवार यांनी यावेळी सांगितले. आर्यवैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, सेवानिवृत्त न्यायाधीश संघाचे अध्यक्ष एम. एन. पाताळे आणि उत्तम दिक्कतवार यांच्या मातोश्री कृष्णाबाई दिक्कतवार यांचा विशेष सन्मान केला. चंद्रकांत पंडित यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. रामकृष्ण दिक्कतवार यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59731 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top