
‘निरामय’तर्फे प्रशिक्षण शिबिर
पुणे, ता. ३ ः ‘निरामय’ संस्थेतर्फे किशोरी शक्ती प्रकल्पाअंतर्गत आयोजित ‘रंग भावनांचे’ या तीन दिवसीय निवासी प्रशिक्षण शिबिरात सुमारे सातशे युवतींनी सहभाग घेतला. शरीरिक, मानसिक, कौटुंबिक, शैक्षणिक, स्वसंरक्षण, आरोग्य आदी विषयांवर या वेळी मार्गदर्शन करण्यात आले. आमदार माधुरी मिसाळ, पश्चिम विभागाचे कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई, ए. जी. डायग्नोस्टिकच्या डॉ. विनंती पाटणकर, संस्थेचे अध्यक्ष ॲड एस. के. जैन, प्रकल्पप्रमुख साधना पवार, उद्योजक गजेंद्र पवार, ज्योतिकुमार कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी यांनी शिबिरात मार्गदर्शन केले. मिसाळ म्हणाल्या, ‘‘उच्च ध्येय, मनाची क्षमता, सातत्यपूर्ण कष्ट करण्याची तयारी, सकारात्मकता, सहनशीलता आणि संघर्ष करण्याची तयारी हे गुण मुलींना यशस्वी करतात. यश मिळवल्यानंतरही जे जमिनीवर राहतात, तेच उंच भरारी घेऊ शकतात. त्यासाठी संकटातील संधी ओळखून यश मिळविले पाहिजे.’’
Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59735 Txt Pune Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..