झोपण्याच्या वादातून पुण्यात भिक्षेकऱ्याचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Murder
झोपण्याच्या वादातून पुण्यात भिक्षेकऱ्याचा खून

झोपण्याच्या वादातून पुण्यात भिक्षेकऱ्याचा खून

पुणे - पदपथावर झोपण्याच्या वादातून अनोळखी भिक्षेकऱ्याच्या (Begger) डोक्‍यात सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून (Murder) करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री एक वाजण्याच्या सुमारास नाना पेठेत घडली. या प्रकरणी समर्थ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली.

मोहित अमीर अंगीर (वय ३०, रा. खडकी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी रिजवान शेख (वय ४१, रा. नाना पेठ) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाना पेठेतील पदमजी चौकातील पदपथावर मागील काही महिन्यांपासून भिक्षेकऱ्यांचा वावर वाढला आहे. रात्रीच्यावेळी भिक्षेकरी पदपथावर झोपतात.

दरम्यान, सोमवारी रात्री सव्वा एक वाजण्याच्या सुमारास मोहित अंगीर हा तरुण पदमजी चौकातील पदपथावर झोपण्यासाठी आला होता. मात्र तेथे अगोदरच झोपलेल्या एका अनोळखी भिक्षेकऱ्याने त्याला झोपण्यास विरोध केला. तसेच त्यास शिवीगाळही केली. या प्रकारामुळे चिडलेल्या अंगीरने तेथेच पडलेला सिमेंटचा ब्लॉक उचलून भिक्षेकऱ्याच्या डोक्‍यात घातला. या घटनेत गंभीर जखमी झाल्याने भिक्षेकऱ्याचा मृत्यू झाला. दरम्यान, याबाबत समर्थ पोलिस ठाण्याला खबर मिळताच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन आरोपीस तत्काळ अटक केली. या प्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव करीत आहेत.

Web Title: Todays Latest Marathi News Pne22c59736 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top